
*आदर्श गाव हरीत गाव मंगी / बु ची यशोगाथा :-
नमस्कार मित्रांनो ....
तुम्हाला काय वाटतं की पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो का ?
नक्कीच होऊ शकतो.
पाच वर्षांमध्ये गाव आदर्श होऊ शकतो त्यासाठी फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि गावकऱ्यांची साथ पाहिजे.
हे सिद्ध करून दाखवलंय मंगी बु गावाने..
जिल्हा परिषद चंद्रपूर , पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारे ग्रामपंचायत मंगी बु येथे पाच वर्षात मंगी बु गावात बरीच विकास कामे झाली आहे.
आदर्श ग्रामपंचायत मंगी बु येथील स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसरात ५४०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. मंगी खुर्द येथील ऑक्सिजन पार्क परिसरात २००० वृक्षलागवडकरण्यात आली आहे, शासकीय आश्रम शाळा परीसरात ३४०० वृक्षलागवडकरण्यात आली आहे,रस्ता दुतर्फा ३८०० वृक्षलागवडकरण्यात आली आहे, नाला खोलीकरण केलेल्या ठीकानी १२०० अशाप्रकारे एकुण १५८०० वृक्षलागवडकरण्यात आली आहे, त्यामुळे लोकांचे सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता आमचे गाव मंगी बु व मंगी खुर्द येथे ऑक्सिजन पार्क उद्यान बनवण्यात आले आहे.
तसेच गावात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बनवण्यात आले आहे. या उद्यानामध्ये बरीच रंगीबेरंगी फुलांची झाडे व आसपासच्या परिसरात व गावातील परिसरात अशोका, पिंपळ, कडूनिंब, वड, नारळ, शेवगा, आवळा, पेरु, अमलतास, जांभूळ, महारुक, हेटी, मेडसिंग, सिसू, शिवन, सेमल, सागवान बांबू, या प्रकारच्या प्रजाती आहे.
मंगी बु गावांमध्ये प्रत्येक वॉर्डात चौकात हरीत पथदिवे व हाय मॅक्स सोलर लाईट बसविण्यात आले आहेत संपूर्ण गावच वाटर सप्लाय हे सोलर लाईट व चालते.
पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी मंगी बु गावामध्ये RO फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगी बु गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यात आले आहे..
ग्रामस्थाच्या आरोग्यासाठी ओपन जीम ची व्यवस्था केली आहे. व तरूण मुलांसाठी वेगळी व्यायामशाळा उभारली आहे.
जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकारी हेमंत भिगारदेवे याच्या नियोजनातुन
जिल्हा परिषद चंद्रपूर, मार्फत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा मनात विज्ञान विषयाबाबत कुतहुल निर्माण होऊन, त्यांच्याअंगी विज्ञानिक दृष्टीकोण वाढवा यासाठी जिल्ह्यातील पहीले Open Science Park मंगी बुज येथील शाळेत उभारण्यात आले आहे.
शाळेतील मुलांना विज्ञान हसत खेळत शिकण्याकरीता सायन्स पार्क ची निर्माण करण्यात आल आहे
व मुलांना अभ्यास करण्याकरीता ,गावातील होतकरू मुलाना अभ्यास करण्याकरिता व ग्रामस्थासाठी वाचनालयाची व्यवस्था केली आहे. गावात सांडपाण्याची उत्तम व्यवस्थापन,नियमित शौचालायाचा वापर,रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गरजू वेक्तीला काम मिळाला आहे. नियमित बालकाचे लसीकरण व 18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. प्लास्टिक वापरास बंदी,एलईडी बलचा वापर, बॉयोगास सयंत्राचा वापर, घनकचरा व्यवस्थापन तसेच लोकसहभागातून जलयुक्त शिवार, पावसाचे पाणी पुनर्भरण, बंधारे व वनराई बंधारे बनवण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान 1.0, 2.0, 3.0 ,4.0 व 5.0 मध्ये उत्तम प्रकारे सहभाग घेतला आहे.
ग्रामपंचायत मंगी बु गावचे वार्षिक उत्पन्न फार कमी आहे.
घर टॅक्स पण खूप प्रमाणात कमी आहे.त्यामधून कर्मचारी वेतन ऑपरेटर वेतन, गावातील दिवाबत्तीची सोय, रंगरंगोटी.
व ईतर खर्च यातून अर्धी निधी निघून जाते.आणि उर्वरित पैशात गाव विकास शक्य नाही.
म्हणून सगळी धावपळ करून गावाला कशा पद्धतीने बक्षिस मिळेल या प्रयत्नांमध्ये गावाला २०२० मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार अंतर्गत गावाला अकरा लाख रुपयाचे बक्षीस प्राप्त करून घेतले
गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार,
२०२१-२०२२ चा जिल्ह्यातून प्रथम आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार 40 लाखाचा पारितोषिक व तालुकातून प्रथम आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार १० लाखाचा पारितोषिक एकूण ५० लाखाचा पारितोषिक मिळाले आहे.जिल्ह्यातून प्रथम रा. संत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार् मिळाला आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार,तसेच विविध मान्यवर विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य गण ,व आसपासच्या कंपनीतील लोकांनी आदर्श ग्राम मंगी बु ची पाहणी करून प्रशंशा केली.
मंत्री महोदय असो जिल्हा परिषद अध्यक्ष,, सदस्य असो आमदार साहेब असो, पंचायत समिती सदस्य असो,यांच्या कडून गावाकरिता निधी मिळावा म्हणून पाच वर्षांपासून सतत धावपळ करणारे आमच्या गावचे सरपंच शंकर तोडासे व उपसरपंच वासुदेव चापले यांनी सतत गावाच्या विकासाकरिता दिवसरातत्र धावपाळ केली.
गावात निधी आणुन गावाचा विकास केला.तसेच २०१२ पासून गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सतत मदत करणारे ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम सर यांनी गावाला स्वच्छ व सुंदर करण्यात मेहनत घेतली.
पाच वर्षाच्या कालावधी मध्ये मंगी बु गावांमध्ये येथे सर्वप्रथम हाय मॅक्स लाईट बसविले. गावातील प्रत्येक गरीब व गरजु लोकांना सबरी , प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यात सरपंच - शंकर तोडसे यांनी खुप मेहनत घेतली त्यानंतर संपूर्ण बंदिस्त नाली सिमेंट रोड,सायन्सपार्क ऑक्सिजन पार्क मनरेगा बचत गटभवन, नालीबंधीस्त , व्यायाम शाळा,वाचनालय पिण्याच्या पाण्याची टाकी, RO फिल्टर वॉटर ,कचराकुंडी, लोकांना बसण्याकरीता सिमेंटी खुर्ची, संपूर्ण गावामध्ये रंगरंगोटी चित्रीकरण,शाळा डिजिटल,भविष्यात पाणी टंचाई येऊ नये म्हणून सार्वजनिक व वैयक्तिक शोषखड्डे,सार्वजनिक शौचालय, स्मशान भूमी रोड,तसेच विविध प्रकारचे विशेष योजना राबवल्या आहेत.
आमचे गाव कसे समृद्धीने भरभराटीने उज्वल होईल आणि सर्व सुख-सुविधा मूलभूत गरजा लोकांना कशा पुरविल्या जातील याकडे आमचे सार्वधिक भर राहणार.
आमचे गाव कसे सुजलाम सुफलाम होईल याकडे लक्ष वेधले आहे.
या सर्व विकासामध्ये माझ्या ,गावचे सरपंच शंकर तोडासे ,उपसरपंच वासुदेव चापले ग्राम विकास अधिकारी नंदिनी कोरवते व सदस्य गण,ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडसाम सर, शाळेचे माझी मुख्याध्यापक भेंडे सर ,शाळेचे सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत कर्मचारी , आशा वर्कर अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष आणि तसेच गावातील दररोज पहाटे नित्यनियमाने पाच वाजता उठून गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सतत मदत करणारे नागरिक व इतर कर्मचारी महिला,यांच्या सहभागामुळेच हे सगळे शक्य झाली आहे.
कारण एकटा ग्रामसेवक किंवा सरपंच गाव विकास करू शकत नाही त्याकरिता सर्वांची मदत असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे .
मंगी (बु ) गाव कसे सुजलाम सुफलाम होईल आणि सर्व सुख सुविधा मूलभूत गरजा लोकांना कशा पुरवल्या जातील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
येणाऱ्या पाच वर्षात खूप सारे विकास कामे मंगी बु गावात करायचे आहे. गावातील प्रत्येक गरजु वेक्तीला घरकुल मिळवून देणे,
गावातील वॉर्डा-वॉर्डात सार्वजनिक शौचालाय बनवणे,गावातील नागरिकांना आंघोळ करण्याकरीता वॉर्डा-वॉर्डात व चौकात गरम पाण्याची टाकी बसवणे, चौका-चौकांमध्ये हात स्वच्छ करण्याकरीता बेसिन लावणे,
सीसीटीव्ही कॅमेरे, मुलांना खेळण्याकरिता सर्व साहित्य पुरवणे, मुलांना शैक्षणिक अभ्यास मोबाईलवर करण्याकरीता व गरजू लोकांना इंटरनेटसाठी गावात चौका-चौकात वायफाय नेटवर्क लावणे,गावातील उर्वरित राहिलेल्या सर्व सीसी रोड पेव्हर ब्लॉक बसविणे,ग्रामपंचायत कडे जाणारा रोड व परिसर सौंदर्यीकरण करणे,
स्मशानभूमी व ऑक्सिजन पार्क परिसराचे सौंदर्यीकरण व तिथे ऑक्सीजन पार्क बनवने,स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रोड चे सौंदर्यीकरण, नाला खोलीकरण व सरळीकरण करणे , पांदण रस्ते बनविणे, गावातील मुले मुली महिला पुरुष यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता पुढचे प्रयत्न करणे, 15800 नवीन वृक्ष लागवड यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करणे.
हे आहे आमच्या आदर्श ग्रामपंचायतचे पुढचे उद्दिष्ट........
येणाऱ्या पाच वर्षात मंगी बु गावचे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की....!
धन्यवाद तसेच सर्वांचे आभार.
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
ग्राम रोजगार सहाय्यक :-दिनेश राठोड ( MSc zoology ) मंगी /बु यांच्या लेखणीतून- ८७६६९५३१०९
डिग्री असुन चालत नाही डिग्रीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता पाहीजे तेव्हाच समाधान मिळतो.
Add a description about this category
Add a description about this item
Add a description about this item
Add a description about this item
Add a description about this category
Add a description about this item
Add a description about this item
Add a description about this item
Add a footnote if this applies to your business
Benjamin Franklin
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.